एप्रिल मासा
April 1-2020 आज एप्रिल महिन्यातला पहिला दिवस. किती बदल होतात प्रत्येक गोष्टींमध्ये. प्रत्येकाच्या शैलीमध्ये,वागण्यामध्ये दिवसमानामध्ये सगळं काही सारखं राहत नाही. दिवसामागे दिवस येतात आणि जातात सगळं बदलत जात आणि ते सर्व आपल्या हातातहि नसतं. काहीच स्थिर राहत नाही ना लोकं , ना परिस्तिथी , ना काळ काहीच नाही. सर्व काही इतिहास जमा होत एक ना एक दिवस. आता चालू असलेली परिस्थिती , आलेली संकट तेही एक ना एक दिवस जातीलाही पण त्याच्या काही छटा मात्र त्या प्रत्येकाच्या मनात खोलवर बिंबवल्या जातील कारण हे सर्वांसाठी सारखाच आहे. स्वरूप जरी वेगळे असले तरी हे सारखेच आहे. सगळे म्हणतात हे नवीन वर्ष काय घेऊन आले आहे पण परिस्थिती सांगून येत नाही कि मी येऊ का म्हणून ती अशीच अचानक येते त्यामुळे त्याचा सामना करताच यायला हवा. एकदाच झुंझ' करून चालत नाही ती सतत करावी लागते आणि त्यात आपण पडतोही मारता सामना करावा लागतो आणि एकदा पडल्यावरउठता येत नाही असाही नाही जीवन आहे उभा गोष्टीची जर तुलना करत राहिलॊ तर पुढे जाटाच येणार नाही तिथेच थांबून जाऊ त्यामुळे य...